विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

गोंदिया : दिनांक ०३/१०/२०२६ रोजी, शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जब्बरटोला, पंचायत समिती गोंदिया येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळाप्रेमी कू. धर्मेंद्र प्रेमकला धोंडू बिसेन रा. बेरडीपार (काचे), तह: तिरोडा, जिल्हा गोंदिया तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. मनोज मेश्राम सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. गावातील बालपणापासून शिक्षण व संस्कारांचा प्रवास, संस्कारांचे जीवनातील महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास, उच्च शिक्षणाच्या विविध शाखा, भविष्यातील रोजगार व कार्यक्षेत्रांच्या संधी, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवकल्पना याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरून नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, तसेच शिक्षणासोबतच चांगले संस्कार, शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती. आशा पारधी मॅडम, श्रीमती. ज्योती उरकुडे मॅडम तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेमाने व आपुलकीने भोजनाची व्यवस्था करणाऱ्या मावशींचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी आयोजित ‘चालता-बोलता स्पर्धे’मध्ये सहभागी विद्यार्थी व विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे पुरस्कार देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळेल हीच आशा.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक वर्ग आणि ग्रामस्थ यांची पुढेही शाळेला साथ लाभणार हीच आशा . 

विद्या विनयेन शोभते !

Comments

Popular posts from this blog

Cyber Hygiene and Cyber Ethics Awareness Workshop Successfully Conducted at Hajjiani Khatija Bai Girls High School, Kamptee

246 Students Trained in Digital Safety at Cyber Awareness Workshop

The Crisis in Junior College Education in Nagpur: A Call for Reform