आंतरराष्ट्रीय युवा दिन विशेष : "शाश्वत विकास हाच एक ध्यास"
आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day) 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी युवा वर्गाचे महत्त्वाचे योगदान, त्यांचे अधिकार, आणि त्यांना आवश्यक असलेल्या संसाधनांची जागरूकता वाढवली जाते. या दिवसाचे आयोजन संयुक्त राष्ट्राने केले असून, त्याचे मुख्य उद्दिष्ट युवांचा विकास, शिक्षण, आणि त्यांच्या समस्यांवरील जागरूकता निर्माण करणे आहे. युवा वर्ग हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण, आणि रोजगार मिळवून देणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. सर्वप्रथम तरुणांनी उच्च स्तरावर विकास साधायचा असेल व शाश्वत सामाजिक विकासाकरिता (Sustainable Social Development) कार्य करायचे असेल तर भाषावाद, जातीयवाद, प्रांतवाद यापासून लांब राहणे व सामाजिक सलोखा तयार करणे नितांत गरजेचे आहे. वैयक्तिक विकास साधत असताना सामाजिक बांधिलकी जपून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणे फार गरजेचे आहे. कोणीही तुम्हाला बाध्य नाही करत की, समाजसेवा करायलाच पाहिजे पण समाजाला आपल्याकडून काही देणं लागतं हे पण विसरू नये. शक्य असल्यास आपल्या विचारशक्तीचा व कार्याचा किमा...