Posts

Showing posts from January, 2026

एडुसन फाऊंडेशनतर्फे आजनी (रामटेक) येथे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र

 रामटेक : १६ जानेवारी रोजी, रामटेक तालुक्यातील आजनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एडुसन फाऊंडेशनचे संचालक डॉ. निलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डॉ. निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोबाईल फोनचा अती वापर अभ्यास व मानसिक आरोग्यास कसा घातक ठरू शकतो, याबाबत सोप्या व समजण्यासारख्या शब्दांत मार्गदर्शन केले. मोबाईलचा मर्यादित आणि योग्य वापर कसा करावा, यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी विद्यार्थ्यांना करिअरबाबत लवकर चिंता न करता शालेय जीवनाचा आनंद घ्यावा, खेळ, वाचन, मित्रमैत्रिणी आणि छंद यामधून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी जीवनासाठी योग्य सहवास, सकारात्मक विचारसरणी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या समुपदेशन सत्रामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व जीवनाकडे पाहण्याची नवी दिशा मिळाल्याची भावना शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा मा...