मानसिक तणाव व तणावाचे व्यवस्थापन
मानसिक तणाव आजच्या दैनंदिन आयुष्यातील असणारी समस्या आहे. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची उद्भवलेली स्थिती म्हणजे `तणाव'. सभोवताली घडणाऱ्या कोणत्याही बदलांना दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद तणावाचे मुख्य लक्षण आहे. मानसिक तणाव असताना बहुधा चुकीचे निर्णय उदयास येते व हेच कारण आपल्या सुंदर आयुष्यात विविध समस्या, अडचणी, व अपयशा करिता सुद्धा कारणीभूत ठरते. त्यामुळे मानसिक तणावाचे योग्य वेळी स्वतःला जाणीव होणे व योग्य वेळी त्याचे व्यवस्थापन (Stress Management) करणे अगदीच महत्वाचे असते. यामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा नकारात्मक परिणाम सुद्धा टाळू शकतो. मानसिक तणावाच्या समस्येला कुणीही बळी पडू शकतो. तणावाचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःकडून लादून घेतलेल्या अवाजवी अपेक्षा, आपला अट्टाहास व अनावश्यक अहंकार. मानसिक तणाव हा पारिवारिक, सामाजिक अथवा व्यावहारिक अनियमितता यामुळे मुख्यत्वे उद्भवतो. यामुळे आत्मपरीक्षण करून आपल्याला तणावाचे मुख्य कारण शोधणे नितांत आवश्यक असते. तेंव्हाच आपण त्याचे समाधान मिळवू शकतो. किंवा आपण आपल्या परिचित असणारे मानसोपचार तज्ञ...