संस्कार, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड; विद्यार्थ्यांना करिअर व सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन

 

पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन 

बेरडीपार काचे, ता. तिरोडा, जि. गोंदिया | दि. २९ ऑगस्ट २०२६

पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार (काचे), पंचायत समिती तिरोडा, जिल्हा गोंदिया येथे आज शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे  आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनभाऊ पटले, सदस्य, जिल्हा परिषद गोंदिया यांची उपस्थिती लाभली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच माजी अध्यक्ष व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘संस्कार ते विज्ञान, विज्ञान ते तंत्रज्ञान’ या मुख्य विषयावर निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्कारांचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकास, उच्च शिक्षणातील विविध शाखा, भविष्यातील रोजगार व कार्यक्षेत्रांच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि बदलत्या काळातील कौशल्यांचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि जिज्ञासेच्या आधारे भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्राची निवड कशी करावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक व जबाबदारीने वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांना सायबर हायजिन व  सायबर एथिक्स  याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. इंटरनेटचा सुरक्षित वापर, APK फाईल्स, व डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रौड्स, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, ऑनलाइन फसवणुकीपासून सावधगिरी आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदार वापर याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. 

या मार्गदर्शन सत्राला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने व्याख्यान ऐकून विविध विषयांवर संवाद साधला. संस्कार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास यांची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेले हे मार्गदर्शन सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.



Comments

Popular posts from this blog

Cyber Hygiene and Cyber Ethics Awareness Workshop Successfully Conducted at Hajjiani Khatija Bai Girls High School, Kamptee

246 Students Trained in Digital Safety at Cyber Awareness Workshop

The Crisis in Junior College Education in Nagpur: A Call for Reform