आंतरराष्ट्रीय युवा दिन विशेष : "शाश्वत विकास हाच एक ध्यास"

आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day) 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी युवा वर्गाचे महत्त्वाचे योगदान, त्यांचे अधिकार, आणि त्यांना आवश्यक असलेल्या संसाधनांची जागरूकता वाढवली जाते. या दिवसाचे आयोजन संयुक्त राष्ट्राने केले असून, त्याचे मुख्य उद्दिष्ट युवांचा विकास, शिक्षण, आणि त्यांच्या समस्यांवरील जागरूकता निर्माण करणे आहे.

युवा वर्ग हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण, आणि रोजगार मिळवून देणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. 

सर्वप्रथम तरुणांनी उच्च स्तरावर विकास साधायचा असेल व शाश्वत सामाजिक विकासाकरिता (Sustainable Social Development) कार्य करायचे असेल तर भाषावाद, जातीयवाद, प्रांतवाद यापासून लांब राहणे व सामाजिक सलोखा तयार करणे नितांत गरजेचे आहे. वैयक्तिक विकास साधत असताना सामाजिक बांधिलकी जपून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याचीसुद्धा दक्षता घेणे फार गरजेचे आहे. कोणीही तुम्हाला बाध्य नाही करत की, समाजसेवा करायलाच पाहिजे पण समाजाला आपल्याकडून काही देणं लागतं हे पण विसरू नये. शक्य असल्यास आपल्या विचारशक्तीचा व कार्याचा किमान १ टक्का तरी योगदान समाजाला लाभला तर वेगळं काही करायची गरज भासणार नाही कारण आपण सगळे तरुण म्हणजे एक प्रभावी विचारधारा, अनोखी कल्पक शक्ती, संशोधनात्मक विचारप्रवाह. याची समजा सांगड घातली तर शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करणे अथवा साध्य करणे सहज शक्य होईल.

शाश्वत विकास हा वाढ आणि मानवी विकासाचा एक दृष्टिकोन आहे ज्याचा उद्देश भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमानाच्या गरजा पूर्ण करणे आहे. 

आपण तरुणांनी लक्षात ठेवायला हवं की, आपण सर्वप्रथम देशाचे नागरिक आहोत, प्रथम भारतीय आहोत त्यामुळे शाश्वत विकासाची उद्दिष्टे अथवा आपला स्वतःचा जरी विकास साधायचा असेल तर धार्मिक कट्टरता, भाषा कट्टरता व प्रांतीय कट्टरता या सर्वांना तिलांजली देणेच योग्य. प्रगतीच्या वाटेवर असताना तरुणांनी आर्थिक व भौतिक हव्यास यापासून दूर राहणे सुद्धा नितांत गरजेचे, कारण कोणताही अती मोह, अट्टाहास, अती आर्थिक स्वरूपाचा हव्यास या सर्व बाबी यशाकरिता पोषक नसून, योग्य वाटचालीकरता अडसर ठरतो. आपण तरुण म्हणजे समाजाचा मजबूत कणा. समजा आपणच विकासाची वाट न धरता चुकीच्या मार्गाने वाहवत गेलो तर हा कणा मोडकळीस येईल व शाश्वत विकासाची उद्दिष्टे अपूर्ण राहतील.म्हणून आपण सर्वांनी या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमत्ताने एकच संकल्प करूया, "शाश्वत विकास हाच एक ध्यास".


डॉ निलेश काळे

संचालक, एडुसन फाऊंडेशन


Comments

Popular posts from this blog

Cyber Hygiene and Cyber Ethics Awareness Workshop Successfully Conducted at Hajjiani Khatija Bai Girls High School, Kamptee

246 Students Trained in Digital Safety at Cyber Awareness Workshop

The Crisis in Junior College Education in Nagpur: A Call for Reform